येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सल्लागार रवींद्र गिंडे, संचालक …
Read More »LOCAL NEWS
विधानपरिषद निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने काँग्रेस नेते हताश : मुख्यमंत्री बोम्माई यांची टीका
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला नेहमीच शक्ती प्रदान करण्याचे काम केले आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची परंपरा विधान परिषद निवडणुकीतही कायम राहील. बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच भाजपने आजवर यश संपादित केले आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस …
Read More »शेतकर्यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …
Read More »समस्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले
बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मंगळवारी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावला आले आहेत. किणये गावाजवळील रिजेंटा हॉटेलमध्ये भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंदीगवाड येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखण्यात आले. …
Read More »विधान परिषद प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्या बेळगावात
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या गतिमान झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. मंगळवार दि. 7 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षनेते आणि पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी भाजपचे राज्यप्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली आणि …
Read More »अलीकडे सिद्धरामय्या खोटे बोलण्यास शिकत आहेत : रमेश जारकीहोळी
बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या …
Read More »…तर शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद; शिक्षण मंत्र्यांची माहिती
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नाही बंगळूर : राज्यातील विशेषत: शाळा, महाविद्यालयातील कोविड सकारात्मक प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर आवश्यक वाटल्यास, कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करून ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेईल, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले. सोमवारी, (ता. 6) …
Read More »हलगा-मच्छे बायपासला कायमची स्थगिती
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज सोमवारी झालेली न्यायालयीन सुनावणी पूर्णपणे शेतकर्यांच्या बाजूने झाली असून न्यायालयाने दाव्याचा अंतरिम निकाल जाहीर होईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या सुनावणीमुळे बायपास रस्त्याच्या कामाला आता कायमचा ब्रेक लागला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत …
Read More »माजी आम. कुडची पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल
बेळगाव : बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी रायबाग येथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. याप्रकारे काँग्रेसमधून निजदमध्ये गेलेले कुडची आता पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. रायबाग येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी …
Read More »तुकाराम बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव : शहापूर येथील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश मरगाळे हे होते. उपस्थित भागधारकांचे स्वागत संचालक श्री. प्रदीप ओऊळकर यांनी केले. बँकेचे कर्मचारी कै. सुनील पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बँकेचे जे सभासद, ठेवीदार व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta