Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमतर्फे मदत

  बेळगाव : टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशभरातून बेळगावात दाखल झालेल्या 600 पेक्षा अधिक तरुण उमेदवारांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमतर्फे पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सीपीईड ग्राऊंड आणि शौर्य सर्कल परिसरात अनेक उमेदवार फुटपाथवर व मोकळ्या जागेत थांबून निवड प्रक्रियेसाठी तयारी करत असल्याचे टीमच्या सदस्यांच्या निदर्शनास …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे बेळगावात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा

  बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे सर्किट हाऊस, बेळगाव येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हा मेळावा विशेषतः आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना बेळगावच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

  बेळगाव : दरवर्षीप्रमाणे युवासेना बेळगाव या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या वर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवराय व बाळासाहेब यांचे पूजन करून शिबिराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी तमाम मराठी भाषिक, युवक, शिवसैनिक यांनी उपस्थित राहून व …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ फेरबदल : दिल्लीतील बैठकींना वेग, निर्णय हायकमांडच्या कोर्टात

  बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक मंत्रिमंडळ फेरबदलाला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या पुन्हा दिल्लीला रवाना होणार असून, फेरबदलाच्या अंतिम स्वरूपाबाबत वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या संपूर्ण घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन …

Read More »

१३ जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी अभूतपूर्व यश मिळवत ९ सुवर्ण, १४ रौप्य व १९ कांस्य असे ४२ पदके जिंकली. या चमकदार कामगिरीच्या बळावर १३ जलतरणपटूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

आमदार आसिफ सेठ यांचा मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दौऱ्यात सहभाग

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ अधिकृत प्रतिनिधीमंडळासह नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री बी. झेड. झमीर अहमद खान यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकातील विकास प्रकल्प, प्रशासकीय समन्वय आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत मंजूर प्रकल्पांना निधी व प्रशासकीय मंजुरी, विभागीय अंमलबजावणीतील …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन उत्साहात

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे आज शाळेच्या पहिल्या ‘ज्योतिर्मयी’ नामक शालेय मॅगझिनच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक विचारांना व्यासपीठ देण्यासाठी हे नियतकालिक सुरू करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि …

Read More »

कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाचा दीपोत्सव उत्साहात

  बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने गल्लीतील श्री वेताळ देवस्थान व श्री बसवाना देवस्थान येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीस अदिती पवार, प्रीती पाटील, मेघना पाटील यांनी मंदिरांसमोर सुंदर रांगोळी रेखाटली. कुमारी ज्योती सुतार हिने दीपोत्सवाबद्दलची माहिती सांगितली. दिव्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तार आमच्या हातात नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : मंत्रिमंडळाचा विस्तारही आमच्या हातात नाही. अशा बाबींवर वरिष्ठ निर्णय घेतात. ते नेतृत्वातील गोंधळाचे निरीक्षणही करत आहेत. त्यांनी स्वतः हे स्पष्ट केले तर बरे होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. केपीसीसी अध्यक्ष होण्याच्या चर्चेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यात ६ कोटी लोक …

Read More »

भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू झाला. प्राणीसंग्रहालयातील मृत हरणांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. १३ नोव्हेंबर रोजी भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ८ हरणांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवसात २० हरणांचा मृत्यू झाला. आज आणखी एका हरणाच्या मृत्यूमुळे चिंता निर्माण झाली …

Read More »