बेळगाव : देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत बेळगावात यावेळेसही श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २६ व्या वर्षीची अखंड श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येत आहे. नवरात्रीच्या 7 व्या दिवशी नेहरू नगर येथील बसवन मंदिर येथून भद्रकाली अवताराच्या पूजनाने श्री दुर्गामाता दौडचा प्रारंभ झाला. श्री दुर्गामाता दौडची सुरुवात …
Read More »LOCAL NEWS
व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहन पार्किंग शेडवर जुनाट झाड कोसळून वाहनांचे नुकसान
बेळगाव : बेळगाव येथील क्लब रोडवरील व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहन पार्किंग शेडवर जुने झाड कोसळल्याने व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहनांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाच्या आवारातील जुने झाड वाहन पार्किंग शेडवर कोसळले . या घटनेत जिवीतहानी झाली नाही पण एक सुमो वाहन पूर्णत: तर दुसऱ्या बुलेरोचे …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा दक्षिण मध्यक्षेत्राने पूर्व पश्चिमक्षेत्राचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
बेळगाव : म. ए. युवा समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी योग्य पावले उचलावीत यासाठी पत्र धाडले असून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. पत्रातील मजकूर खालील प्रमाणे.. मागील ६८ वर्षे बेळगावसह ८६५ गावे महाराष्ट्र राज्यात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. आपण स्वतः …
Read More »डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू
बेळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बेळगावात घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी बुधवारी केला. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी गावातील आरती चव्हाण (३२) ही गर्भवती होती. आरतीला मंगळवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने गोंधळी गल्ली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचवीस हजार पैसे भरल्यानंतर सकाळी अकरा …
Read More »नवहिंद सोसायटीच्या वतीने डेप्युटी रजिस्ट्रार रवींद्र पाटील यांचा सत्कार
येळ्ळूर : सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को ऑप. क्रेडीट सोसायटी लि; येळ्ळूरतर्फे बेळगांव जिल्हा सहकार खात्याच्या डेप्युटी रजिस्ट्रारपदी बढती मिळाल्याबद्दल रविंद्र पारसगौडा पाटील यांचा नवहिंद भवनच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. व्यासपिठावर नवहिंद …
Read More »साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी व्याख्यानाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्राध्यापिका संध्या चौगुले, सातारा यांचे “शिक्षकांसाठी शिक्षणातील बदलते प्रवाह व शैक्षणिक नवोपक्रम” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापिका संध्या चौगुले यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री. सुभाष …
Read More »पहिले, दुसरे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली येथे होणार रेल्वे उड्डाणपूल
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी शहरातील विविध रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामासंदर्भात अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रेल्वे विभागाचे अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून आगामी काळात टिळकवाडीतील पहिले व दुसरे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट येथे उड्डाणपूल …
Read More »संतप्त शेतकऱ्यांनी हलगा-मच्छे बायपासचे कामकाज बंद पाडले
बेळगाव : शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपासचे कामकाज आज सुरु करण्यात आले. दरम्यान आजपासून सुरु होणारे या कामाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच कळाली होती. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुरू करण्यात आलेल्या कामाला विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे. अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी …
Read More »कर्नाटक राज्यात राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर : प्रकाश मोरे
बेळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीदरम्यान चर्चेवेळी कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष बांधणी बळकट करण्यासाठी भेटीदरम्यान चर्चा झाली असून लवकरच कर्नाटक राज्यात पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश …
Read More »