बेंगळुरू : आठवड्याभरात कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्हे आणि डोंगराळ प्रदेशातील शिमोगा आणि चिक्कमंगळूरू जिल्ह्यांसारख्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू आणि शिमोगा आदी जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 7 जुलैनंतर किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. राजधानी बंगळुरूमध्ये आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला असून, किनारपट्टीचे जिल्हे वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे, असे म्हणता येईल.
Belgaum Varta Belgaum Varta