Friday , December 12 2025
Breaking News

हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा

Spread the love

 

येडियुरप्पांचे काँग्रेसला आव्हान; भाजप राज्य कार्यकारिणीची विशेष बैठक

बंगळूर : मे २०२३ मध्ये राज्यात प्रचंड बहूमतासह सत्तेवर आलेल्या सत्ताधारी काँग्रेसने एका वर्षाच्या अल्प कालावधीत लोकप्रियता गमावली असल्याचा दावा करत भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विधानसभा विसर्जित करून नव्याने जनादेश मागण्याचे आव्हान दिले.
“मी तुम्हाला सांगू शकतो की जर आता निवडणुका झाल्या तर भाजप २२४ सदस्यीय विधानसभेत १४० ते १५० जागा जिंकून परत सत्तेवर येईल, असे येडियुरप्पा यांनी बंगळुर येथे भाजपच्या विशेष राज्य कार्यकारिणीला संबोधित करताना सांगितले.
“काँग्रेसला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी कर्नाटकच्या हिताचे रक्षण करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचारात गुंतल्यामुळे तिची लोकप्रियता गमावली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज्य विधानसभेत काँग्रेसचे १३६ सदस्य असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १४२ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली आहे.
“आमच्याच चुकांमुळे लोकसभेच्या काही जागांवर आम्हाला धक्का बसला. मात्र जनतेने काँग्रेसच्या कुशासन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केले आहे, असा दावा त्यांनी केला.
जिथे जमेल तिथे त्यांनी जनतेचे कर वाढवून लोकांच्या पोटावर पाय दिला आहे. सरकार दिवाळखोर झाले नसते तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याची गरजच पडली नसती. दुष्काळ असला तरी कावेरीचे पाणी दिले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.
विधानसौधमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेपूर्वीच मूडा घोटाळा उघडकीस आला, पोलिस ठाण्याला घेराव, दलित महिलेवर हल्ला, वाल्की महामंडळाचा घोटाळा चव्हाट्यावर आला. पुढच्या अधिवेशनात सर्व घोटाळे उघड होतील, अशी गर्जना त्यांनी केली.
महर्षि वाल्मिकी एसटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मुडामधील कथित आर्थिक फसवणुकीचा संदर्भ देत, त्यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणि मुख्यमंत्र्यांवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे आवाहन केले. या मोहिमेचा एक भाग म्हणून पक्षाच्या नेत्यांनी राज्याचा दौरा करावा, अशी सूचना त्यांनी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, भाजपचे कर्नाटकचे निवडणूक प्रभारी राधामोहन दास अग्रवाल, विरोधी पक्षनेते आर. अशोक, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, शोभा करंदलाजे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि बसवराज बोम्मई बैठकीत सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *