Thursday , September 19 2024
Breaking News

‘वाल्मिकी’ महामंडळ घोटाळा : माजी मंत्री बी. नागेंद्र, आमदार दड्डल यांच्या घरावर ईडीचे छापे

Spread the love

 

बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील कोट्यवधींच्या बेकायदेशीर प्रकरणासंबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष बसनागौडा दड्डल आणि माजी मंत्री नागेंद्र यांच्या घरावर छापा टाकला आहे.
रायचूरच्या आशापुर रोडवरील आरआर (राम रहीम) कॉलनीतील प्रभाग क्रमांक २ मधील दड्डल यांच्या घरावर तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सकाळी ७ वाजल्यापासून घरातील कागदपत्रे तपासली.
बेळ्ळारीतील नेहरू कॉलनीतील बी. नागेंद्र यांच्या घरावर चार अधिकाऱ्यांच्या पथकाने पहाटे ३ ते ४ वाजता छापा घातला. नागेंद्रच्या नातेवाईकांची माहिती गोळा करणारे ईडीचे अधिकारी नागेंद्रच्या घरातील कागदपत्रेही तपासत आहेत. ईडीला स्थानिक पोलिसांची मदत न मिळाल्याने सीआरपीएफ जवानांच्या सहकार्याने छापा टाकण्यात आला. डॉलर्स कॉलनीतील नागेंद्रच्या घरावर, बंगळुरमधील रामकब्लू अपार्टमेंटमध्ये छापे टाकणारे अधिकारीही कागदपत्रे तपासत आहेत. त्याचप्रमाणे, बसवनगौडा दड्डल यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त, ते एकाच वेळी बंगळुर शहरातील यलहंका आणि कोरमंगलासह १८ ठिकाणी छापे टाकत आहेत आणि महत्त्वाची कागदपत्रे तपासत आहेत.
याशिवाय महामंडळाचे एमडी जे जे पद्मनाभ, लेखापाल परशुराम यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. नागेंद्र यांचे निकटवर्ती आपटा नेकंटी नागराज, सत्यनारायण वर्मा आणि इतर अनेकांच्या घराची आणि कार्यालयाचीही तपासणी केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी पद्मनाभ यांचे बंगळुर येथील निवासस्थान आणि हैद्राबादमधील सत्यनारायण वर्मा यांच्या निवासस्थानासह एकूण १८ ठिकाणी छापे टाकले आणि तपासणी केली.

….म्हणून सहभाग ठरत नाही
आमदार बी. नागेंद्र आणि आमदार बसवनगौडा दड्डलच्या यांच्या घरावर छापा टाकताच, या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका होती असा अर्थ घेऊ नये. ईडीने कोणत्या आधारावर छापा टाकला हे माहीत नाही, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. काल नागेंद्र आणि दड्डल यांची चौकशी करण्यात आली. आजही खटला सुरू राहणार आहे. महामंडळाचे माजी व्यवस्थापक पद्मनाभ आणि परशुराम यांच्या ऑडिओ व्हायरल प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, एसआयटीची चौकशी सुरू आहे आणि ते सर्व माहितीचे निरीक्षण करत आहेत सीबीआय बँकेच्या फसवणुकीचाही तपास करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *