बेंगळुरू : जामिनावर सुटलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना रामनगर येथील कागलीपूर पोलिसांनी अटक केली आहे. आमदार मुनीरत्न यांना पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली आहे. बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणी रामनगर पोलिसांनी मुनीरत्नला अटक केली आहे.
जातिवाचक शिवीगाळ आणि कंत्राटदाराच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मुनीरत्नला काल न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर सुटका झालेल्या मुनीरत्नला आता पोलिसांनी पुन्हा अटक केली असून ते पुन्हा तुरुंगात जाण्याची दाट शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta