काँग्रेस नेत्यांचीच चौकशीची मागणी
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मधील कथित अनियमिततेची धूळ अद्याप सुटलेली नसताना, आणखी एक शहर विकास प्राधिकरण अडचणीत आहे. आता, बेळ्ळारी नागरी विकास प्राधिकरण (बुडा) घोटाळ्याचा वाद सुरू झाला आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाला असून, अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे. बुडा प्रकरणात, आरोप बुडा चेअरमन जे. एस. अंजनेयालू यांच्यावर आहेत, जे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या जवळचे आहेत.
बळ्ळारी शहराचे आमदार ना. रा. भरत रेड्डी आणि कांपलीचे आमदार जे. एन. गणेश या काँग्रेस नेत्यांनी सरकारला पत्र लिहून बुडामध्ये अनियमिततेचा आरोप केला आहे. या पत्रांनंतर सरकारने तपास पथकाची स्थापना केली होती, ज्याने शनिवारी तपास पूर्ण केला. बुडाने मार्च आणि जुलैमध्ये लेआउट तयार करण्याचे ठराव पारित केले.
निवडलेले लाभार्थी अध्यक्षांच्या जवळचे असून त्यांच्या काही नातेवाईकांचाही समावेश असल्याचा आरोप काँग्रेसच्या दोन आमदारांनी केला. परंतु अंजनेयालू यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, जागा मंजूर करताना सर्व नियमांचे पालन केले गेले. त्यांनी सांगितले, “माझ्याच पक्षाच्या आमदारांनी माझ्याविरोधात तक्रार केली आहे. ते माझे वरिष्ठ आहेत आणि मला कोणावरही भाष्य करायचे नाही. मात्र बुडामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. मला विश्वास आहे की या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेली समिती मला क्लीन चिट देईल.