Thursday , December 11 2025
Breaking News

म्हैसूर येथील मुडा कार्यालयावर ईडीचा छापा

Spread the love

 

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ; आरोपी देवराजू याच्या निवासस्थानावरही छापा

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) बेकायदेशीर जागा वाटप प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आणखी अडचणीचा सामना करावा लागला आहे. कारण अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुडा कार्यालयावर छापा टाकून कांही कागदपत्रेे तपासली व माहिती घतली. दरम्यान या प्रकरणातील चौथा आरोपी देेवराजू यांच्या निवासस्थानावरही छापा टाकून तपास करण्यात आला.
मुडा घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या लोकायुक्त एफआयआरच्या आधारे नुकतीच ईसीआयआरची नोंद करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज म्हैसूरमधील मुडा कार्यालयावर छापा टाकला.
ईडीचे २० हून अधिक अधिकारी मुडा कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. तसेच या प्रकरणातील चौथा आरोपी देवराजू याच्या केंगेरी निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
ईसीआयआर हे पोलिस एफआयआर सारखेच आहे. ईडीने दाखल केलेल्या ईसीआयआरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आरोपी क्रमांक १ (आरोपी ए १) आहेत. सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती सिद्धरामय्या यांच्याशिवाय, त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि जमीन विकणारे देवराजू यांचाही ईसीआयआरमध्ये आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात ईसीआयआर नोंदविला आहे, ज्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता जप्त केल्या जाऊ शकतात, तसेच इतर जबरदस्ती उपाय देखील केले जाऊ शकतात. तसेच, ईडीला आरोपींना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे.
दरम्यान, तक्रारदार स्नेहमाई कृष्णा यांनी सीबीआय किंवा ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडूनच निष्पक्ष तपास होऊ शकतो, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रार तर केलीच पण कागदपत्रेही सादर केली आणि निवेदनही दिले.
त्याआधारे आजवर कायदेशीर तपासणी करणारे अंमलबजावणी संचालनालय आज रिंगणात उतरले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सशस्त्र रक्षकांसह शोध मोहीम राबविण्यात आली. मुडाचे सचिव प्रसन्नकुमार यांनी या संदर्भात निवेदन दिले असून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुडाकार्यालयात येऊन माहिती मागवली आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *