मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत डीवायएसपीने चक्क पोलिस स्थानकातच “रासलीला” केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पावगड येथील जमिनीच्या वादाची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला मधूगिरीचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी कार्यालयाच्या शौचालयात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून “रासलीला” केली. काहींनी मोबाईलवर याचे चित्रीकरण केले आहे. डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, या घटनेमुळे पोलीस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावले आहे. डीवायएसपी रामचंद्रप्पाच्या या कृत्याचे एका व्यक्तीने मोबाईलद्वारे चित्रीकरण केले असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta