
बंगळूरू : अन्नभाग्य योजनेअंतर्गत सरकारने रेशन कार्डधारकांना आता पैसे ऐवजी थेट दहा किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याला आदेश देण्यात आला होता की, प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात यावे. मात्र आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्च महिन्यात वाटप करण्यात येणारे 5 किलो आणि फेब्रुवारी महिन्यातील शिल्लक 5 किलो असे दहा किलो तांदूळ देण्याचा आदेश रेशन दुकानदाराना देण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 12 मार्चपासून अन्नभाग्य योजनेअंतर्गत तांदूळ वितरण करण्यात येणार आहे. अन्नभाग्य योजना कर्नाटकात लागू करण्यात आली होती. याअंतर्गत प्रतिमानसी पाच किलो तांदूळ देण्यासाठी सरकारने 34 रुपये किलो प्रमाणे प्रति व्यक्ती 170 रुपये रेशन कार्डधारकांना देऊ केले होते. झारखंडमध्ये भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने तांदळाचे दर घसरले. सध्या तांदूळ बावीस रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असल्याने राज्य सरकारने पैसे न देता थेट तांदूळ लाभार्थींना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरी प्रति किलो 12 रुपयाची बचत होणार आहे. यापुढे दर महिन्याला 170 रुपयांच्या बदल्यात पाच किलो तांदूळ देण्यात येणार आहे. मार्च महिन्यातील दहा किलो तांदूळ आणि फेब्रुवारी महिन्यातील पाच किलो मिळून दरडोई 15 किलो तांदूळ लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta