
यादगिरी : यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मद्दरकी जवळ राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला असून यात चार जण जागीच ठार झाले आहेत.
शरणप्पा (30), सुनिता (19), सोमव्वा (50) आणि थंगम्मा (55) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व वर्कनहळ्ळी गावातील रहिवासी आहेत. इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक कलबुर्गी येथील भाग्यवंती देवीच्या दर्शनासाठी जात होते.
यादगिरी तालुक्यातील भीमरायणगुडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. एसपी पृथ्वी शंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta