पत्नीकडूनच हत्या झाल्याचा संशय
बंगळूर : निवृत्त पोलिस महासंचालक (डीजी आयजीपी) ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना बंगळुरमधील एचएसआर लेआउटमधील एका घरात घडली.
कर्नाटक केडरचे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांनी राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून काम केल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती घेतली. ते बंगळुरातील एचएसआर लेआउटमध्ये राहत होते. रविवारी दुपारी ओम प्रकाश घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. चौकशीत त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. ओम प्रकाश यांची हत्या त्यांची पत्नी पल्लवी यांनीच केल्याचे उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी केली. सध्या, महिलेनेच ही हत्या केल्याची माहिती मिळाली असून तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
आर्थिक समस्या
ओम प्रकाशचे कुटुंब आर्थिक समस्यांना तोंड देत होते. या संदर्भात, माजी डीजी आणि आयजीपी अधिकारी ओम प्रकाश यांनी खूप कर्ज घेतले होते. घरात पैशाच्या कारणावरून वारंवार वाद होत असत. या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे, ओम प्रकाश यांनी त्यांच्या पत्नीला न देता, त्यांनी मिळवलेली मालमत्ता थेट त्यांच्या मुलाच्या नावावर लिहून दिली होती. त्याच कारणावरून पत्नीने रागातून ही हत्या केल्याचेही आरोप आहेत. चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल.
ओम प्रकाश हे बिहारचे आहेत. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील ओम प्रकाश यांनी आयपीएस अधिकारी झाल्यानंतर तत्कालीन बेळ्ळारी जिल्ह्यातील हरपनहळ्ळी येथे एएसपी म्हणून राज्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, त्यांनी शिमोगा, उत्तर कन्नड आणि चिक्कमंगळूर जिल्ह्यांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्यांनी कर्नाटक लोकायुक्तमध्ये राज्य दक्षता कक्षाचे एसपी, अग्निशमन विभागाचे डीआयजी आणि सीआयडीचे आयजीपी म्हणून काम पाहिले होते. मार्च २०१५ मध्ये राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त झालेले ओम प्रकाश २०१७ मध्ये निवृत्त झाले.
कारकिर्द
त्यांनी बेळ्ळारीतील हरपनहळ्ळी येथे एएसपी म्हणून काम केले. त्यांना विविध जिल्ह्यांमध्ये राज्य दक्षता आयोग, लोकायुक्त आणि एसपी पदांवर बढती देण्यात आली. १९९३ मध्ये त्यांनी भटकळ जातीय दंगली हाताळल्या आणि डीआयजी (प्रशासन), डीआयजी-उत्तर विभाग, डीआयजी-प्रशिक्षण आणि डीआयजी अग्निशमन दल म्हणून काम पाहिले. त्यांची नियुक्ती सीआयडीमध्ये झाली आणि त्यांनी परिवहन आयुक्त म्हणूनही काम केले. त्यांनी एडीजीपी (गुन्हे आणि तांत्रिक सेवा) आणि एडीजीपी (तक्रार आणि मानवी हक्क) म्हणून काम केले होते. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी डीजी आणि आयजीपी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते निवृत्त झाले.
Belgaum Varta Belgaum Varta