
बंगळूर : अत्याचार आरोप प्रकरणासंदर्भात माजी धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी दाखल केलेला जामीन अर्ज सलग दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायाधिश संतोष गजानन भट यांच्या खंडपीठाने फेटाळला आहे.
हसन जिल्ह्यातील होळेनरसीपुर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अत्याचार प्रकरणासंदर्भात माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसऱ्यांदा दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या बंगळुरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे आणि आदेश जारी केला आहे.
यापूर्वी ट्रायल कोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने प्रज्वलचा जामीन अर्ज फेटाळला होता. आता पुन्हा एकदा जमीन अर्ज फेटाळण्यात आला आहे
सोशल मीडियावर अनेक महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे २,९०० हून अधिक व्हिडिओ फिरत आहेत, ज्यामध्ये गेल्यावर्षी नोंदवलेल्या चार अत्याचाराच्या गुन्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये माजी खासदार प्रज्वल रेवण्णा हे मुख्य आरोपी आहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती, की रेवण्णा कुटुंबाच्या फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केला. प्रज्वल रेवण्णा तिच्यावर वारंवार अत्याचार करत होते आणि अत्याचाराबद्दल बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देत होते.
या संदर्भात प्रज्वल विरुद्ध अत्याचार लैंगिक छळ गुन्हेगारी धमकी आणि खासगी प्रतिमांचे आणि अनधिकृत प्रसारण यासह विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta