
बेंगळुरू : पीएसआय नियुक्तीमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून केपीसीसी राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला असून ४० टक्के कमिशन प्रमाणे आता हि बाबदेखील जगजाहीर झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय. चिक्कमंगळूर येथील हरिहरमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीएसआय नियुक्ती घोटाळा काँग्रेसनेच उजेडात आणला आहे. पीएसआय नियुक्ती घोटाळा आणि काँग्रेसचा काय संबंध आहे? असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित करत आहेत. भाजपचीच सत्ता राज्यात कार्यरत असून भाजप सत्ता काळात झालेले घोटाळे आणि अन्याय आता संपूर्ण जगासमोर येत आहेत. सभागृहाच्या कामकाजादरम्यान भाजप सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेसनेच आवाज उठविला असल्याचेही डीकेशी म्हणाले. भाजप सरकार राज्यातील तरुणांवर अन्याय करत अअसून राज्यात जवळपास ५५ हजार तरुण आहेत. या तरुणांवर भाजपकडून अन्याय होत आहे. भाजप सरकारची ४० टक्के कमिशनची बाब उजेडात आली आहे. शिवाय भाजपच्या घोटाळ्यात गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र हेदेखील जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta