अंडीफेक वाद वाढला; कॉंग्रेसची ‘मडिकेरी चलो’ची हाक, भाजपची जनजागृती बैठक
बंगळूर : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अंडी फेकल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मडिकेरी चलो’ची हाक दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही पलटवार केला असून मडिकेरी जिल्हा भाजप युनिटने २६ तारखेला जनजागृती बैठक बोलावली आहे.
जनजागृती समावेशमध्ये सिद्धरामय्या यांच्या विरोधात अनेक मुद्दे नमूद करण्यात येणार आहेत. भाजपने सिद्धरामय्या यांच्या गोमांस सेवनाच्या विधानाविरोधात जनजागृती करण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे २६ ऑगस्टला मडिकेरीतील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने मडिकेरी चलोची हाक दिली आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मडिकेरी दौऱ्यात त्यांच्या कारवर अंडी फेकल्यानंतर, सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी मडिकेरी चलोची अधिकृत नोटीस बजावली आहे. २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसने मडिकेरी चलोची अधिकृत घोषणा जारी केली. विधीमंडळ पक्षाचे सचिव ई. तुकाराम यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडी फेकल्याच्या पार्श्वभूमीवर, सिद्धू चाहत्यांनी २३ तारखेला म्हैसूरहून पदयात्रेची तयारी केली आहे. आज म्हैसूरमध्ये प्राथमिक बैठक होणार असून त्यात मोठ्या संख्येने लोकांचा समावेश करून रुपरेषा तयार करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. हुनसूर तालुक्यातील कल्लहळ्ळी येथून पदयात्रेसाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम माजी मुख्यमंत्री डी. देवराज आरस यांच्या समाधीवर प्रार्थना केल्यानंतर. एस शिवराम यांच्या नेतृत्वात या पदयात्रेचे नेतृत्व करण्यात येणार आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांच्या विरोधात रान उठवले आणि मुस्लिम भागात सावरकर फ्लेक्स का लावायचे असा सवाल करत दि. १८ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागात आलेल्या विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आणि काळे झेंडे दाखवले. याप्रकरणी पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली. आरोपी जामीन मिळवून बाहेर आले आहेत.
भाजप कार्यकर्ता संपत याने अंडी फेकल्याची माहिती आहे. तो भाजपचा असला तरी त्याला हाताशी धरून तो कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा भाजपकडून जाणीवपूर्वक कांगावा करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. आता संपतचे भाजपचे आमदार अप्पाच्चू रंजनसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta