बेंगळुरू : रामनगर येथील कंचुगल मठाचे स्वामी बसवलिंगेश्वर (वय 45) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वामी बसवलिंगेश्वर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आले होते. एका अज्ञात महिलेसोबत त्यांचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. स्वामी बसवलिंगेश्वर यांनी सोमवारी आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली होती. त्यात त्यांनी ब्लॅकमेलचा उल्लेख केला होता. बसवलिंगेश्वर स्वामी हे संबंधितमहिलेला 6 महिन्यांपासून ओळखत होते. तिच्यासोबत 4 व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले होते. त्याआधारेच त्यांना ब्लॅकमेल केला जात होता. ही महिला आणि तिच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta