बेंगळुर : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते नक्की पार पडेल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जत तालुका हा तीव्र दुष्काळग्रस्त तालुका आहे. त्यांना मी सर्व प्रकारची मदत करण्याची हमी दिली आहे. जत तालुका कर्नाटकात सामील करावा यासाठी तिथल्या सर्व ग्राम पंचायतींनी ठराव केला आहे. मी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. महाराष्ट्रातील कन्नड शाळांच्या विकासासाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये निवास करणार्या कन्नडिगांपैकी ज्या कोणाचा एकीकरण आंदोलनात सहभाग होता त्यांनी आपली कागदपत्रे, दाखले सादर करावीत. सरकारकडून त्यांना पेन्शन लागू करण्यात येईल. राज्याराज्यातील जनतेत फूट पाडण्याचे काम महाराष्ट्र सरकार तसेच मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. दोन्ही राज्यात सौहार्दता कायम राखली गेली पाहिजे. सर्व भाषिकांना समान दृष्टीने पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर दिली.
Belgaum Varta Belgaum Varta