हुबळी : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कलघटगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी माजी मंत्री संतोष लाड यांनी दर्शवली आहे.
हुबळी येथे आज रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संतोष लाड म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सिद्धरामय्या यांना राज्यातील अनेक भागांतून बोलावले जात आहे. आता कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. सामूहिक विवाह समारंभ करणे मला नवीन नाही. केवळ लॉकडाऊनमुळे काही वर्षे तो केला नाही. आता आम्ही पुन्हा सामूहिक विवाह समारंभ आयोजित करण्यावर विचार करत आहोत. हा उपक्रम कोणत्याही राजकीय हेतूने करत नाही. यावेळी 4000 विवाह लावण्याचा माझा प्रयत्न आहे. तो विश्वविक्रमही होऊ शकतो. मी 12000 सामूहिक विवाह लावले आहेत. या संदर्भात राज्यातील विविध जिल्ह्यातून फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.भाजप फक्त वाद निर्माण करतो. विकास करण्याची त्यांना गरज वाटत नाही. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर टीका केली तर विरोधी पक्षाच्या विधानावर सत्ताधारी पक्ष पलटवार करतो. लोकांना हे समजेल, असे ते म्हणाले. मी मराठा समाजाचा नेता आहे. पण आपण कर्नाटकात असताना आपल्या भूमीचा आणि भाषेचा आदर केला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात आहे. याबाबत मी अधिक बोलणार नसल्याचे संतोष लाड यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta