बेंगळुरू : सीमावाद जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे नेते याविषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरून आता बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करत थेट आव्हान दिले आहे.
महाराष्ट्राचे शिष्टमंडळ काल भेटल्यानंतर बोम्मई ट्वीट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे म्हणत त्यांनी राज्याच्या नेत्यांना डिवचलं आहे.
पुढच्या दोन दिवसांत मी कर्नाटकच्या खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट घेण्यास सांगितल आहे. तसेच राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे बोम्मई म्हणाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta