विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड यांची टिका
विजयपूर : राज्यातील बंजारा तांडाचे महसूल ग्राम म्हणून परिवर्तन करणे, बंजारा समाज बांधवांना हक्कपत्र वितरण करण्याची योजना काॅंग्रेस पक्षाच्या सरकारने अनुमोदन केले होते, अलीकडेच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी हक्कपत्र वितरण करुन काॅंग्रेस पक्षाने बनविलेले स्वयंपाक वाढण्याचे कार्य केले असल्याची टिका विधान परिषदेचे सदस्य प्रकाश राठोड यांनी केले.
काॅंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, 2013 मध्ये काॅंग्रेस पक्षाच्या सरकारने राज्यातील बंजारा तांडाचे महसूल ग्राम म्हणून परिवर्तन करण्याची योजना आखली होती, तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक समिती स्थापन करून समिक्षा करून, जिल्हा प्रशासनानाकडून प्रस्ताव मागवून त्यास अनुमोदन करून सही करून हा प्रस्ताव राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. पुढील कारवाईचा भाग म्हणून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी हक्कपत्र वितरण करण्याचे कार्य करून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
काॅंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन महसूल मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही योजना आखली होती, राज्यातील 270 बंजारा तांडाचे महसूल ग्राम म्हणून परिवर्तन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पुढे सिद्धरामय्या यांचा सरकारने त्यासंदर्भात सखोल अभ्यास करून त्यास अनुमोदन करून अंमलबजावणी करण्याचे ठरविले होते, ही योजना म्हणजे काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे स्वप्न होते असे सांगून ते पुढे म्हणाले, बंजारा समाजाचा विकासासाठी काॅंग्रेस पक्षाने योगदान दिले आहे, बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समावेश करणे, संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करणे, संत सेवालाल महाराजांच्या जन्मस्थळ विकासासाठी रु 150 कोटी रुपये अनुदान, बंजारा अभिरूद्धी निगमची स्थापना करून रु. 450 कोटी निधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य काॅंग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, आज भाजपा त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहे असे सांगितले.
या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रचार समितीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक टपाल, साहेबगौडा बिरादार, प्रेमसिंग चव्हाण, एम. एस. नाईक, संजीव इंडी व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta