विजयपुर येथील दुर्दैवी घटना
विजयपुर : विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील विठ्ठलवाडी तांडा येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे.
पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पीडित महिलेने तिच्या तीन कोवळ्या मुलांसह पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली.
गीता रामू चौहान (३२) तिची तीन मुले सृष्टी (६), किशन (३), समर्थ (४) यांचा मृत्यू झाला. पती रामू आणि पत्नी गीता यांचे काल रात्री कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर गीता मुलांसोबत घराबाहेर पडली आणि पाण्याच्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली.
तिकोटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta