विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत समारोप समारंभा : संगमेश चुरी
विजयपूर : दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी आयोजित कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे उद्घाटन दि. 4 शनिवारी सकाळी 10.30 मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून तर समारोप समारंभास विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विजयपूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, ज्ञानयोग आश्रमाचे अध्यक्ष पूज्य श्री बसवलिंग स्वामीजींचा सानिध्यात होणारे या संमेलनास मंत्री गोविंद कारजोळ हे स्मरण संचिकाचे वितरण करणार आहेत. वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मुरगेश निराणी यांचा हस्ते करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री सी. सी. पाटील, शहर आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ, आ.ऐ.एस पाटील नडहळ्ळी, आ. सोमनगौडा पाटील सासनूर, आ. रमेश भोसनूर, आ. देवानंद चव्हाण, अप्पासाहेब पटृणशेटी, विजूगौडा पाटील,
जिल्हा माहिती कार्यालय अधिकारी डॉ. पी. एस. हर्ष, जिल्हा अधिकारी डॉ विजयमहांतेश धान्नम्मनवर, जिल्हा परिषद मुख्य राहुल शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. आनंद कुमार सहभागी होणार आहेत.
दोन दिवस दुपारच्या सत्रात पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा सत्र, संवाद व व्याख्यान मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तर दि. 5 रोजी ज्ञानयोग आश्रमाचे अध्यक्ष पूज्य श्री बसवलिंग स्वामीजींचा सानिध्यात होणारे समारोप समारंभास विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे उपस्थित राहणार असून, याच प्रसंगी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांना राज्य प्रशस्ती प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी मंत्री आर.अशोक, शशीकला जोल्ले, माजी मंत्री काॅंग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, आ. शिवानंद पाटील, आ. यशवंतरावगौडा पाटील, विधान परिषदेचे सदस्य प्रकाश राठोड, सुनीलगौडा पाटील, अब्दुल हमीद मुश्रीफ, यांचासह जनप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार असून, संमेलनास जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असून संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, डी. बी. वडवडगी, उपाध्यक्ष इंदुशेखर मनूर, फिरोज रोजीनदार, मल्लिकार्जुन मठ, के. के. कुलकर्णी, कौशल्या पन्हाळकर, अविनाश बिदरी, राहुल आपटे व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta