Sunday , July 26 2026
Breaking News

पिरनवाडीत 26 फेब्रुवारीला जंगी कुस्त्यांचे मैदान

Spread the love

 

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी अयोजित २६ फेब्रुवारीला पिरनवाडी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार होणार आहे.
स्पर्धेसंदर्भात पूर्व तयारी करण्यासाठी आज (गुरुवारी) कुस्तीगीर कार्यालय संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचंडीकर, सेक्रेटरी सचिन गोरले, उद्योगपती सतीश पाटील, ग्राम पंचायंत अध्यक्ष राकेश तळवार, वरिन्द्र मुचंडीकर, मल्लाप्पा उचगावकर, मोहन शास्त्री, सुधाकर देसाई, अप्पाय्या नानापा पाटील, अनसार हुबळीवाले, इंतीयाज बडीजरवाले, लथीप डी मुजावर, युनूस मुजावर, मुन्ना नंबिवाले, राजू पाटील, वैजू पाटील, महावीर पाटील, अप्पाना पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. उरूसाचे निमित्त आयोजित प्रती वर्षा प्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती जसा पट्टी व गुरुप्रीत सिंग दिल्ली (भारत केसरी) यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पालंदर मथुरा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चांम्पियन बाळू बोकडे व हॅम्पी पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे व राकेश कुमार (पंजाब) यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती संगमेश (मठपती आकाडा ) व विक्रम भोसले यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवाय्या पूजारी वि. विनय मांडवे याशिवाय 50 हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी सर्वासाठी खुले आहे. सर्वांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन शिव सेना तालुका प्रमुख व कुस्ती संघटनेचे सेक्रेटरी सचिन गोरले यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *