Friday , March 6 2026
Breaking News

बेळगावचे माजी पोलिस कमिश्नर भास्कर राव यांचा “आप”ला रामराम; भाजप प्रवेश

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भास्कर राव यांनी आज 1 मार्च रोजी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला. पत्रकारांना संबोधित करताना भास्कर राव यांनी ‘आप’वर जोरदार निशाणा साधला.

भास्कर राव म्हणाले, ‘आप’मध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो. ‘आप’चा विकास आता होऊ शकत नाही. ‘आप’च्या दोन मंत्र्यांचं तुरुंगात जाणं लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले. सीबीआयनं काल अबकारी घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केलीये. त्याचबरोबर माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत
भास्कर राव पुढं म्हणाले, मी पीएम मोदींपासून खूप प्रेरित आहे. पंतप्रधानांची कामं पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला वाटतं की, मी भाजपमध्ये अधिक योगदान देऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीनं मला पक्षात येण्याची प्रेरणा दिली. भास्कर राव 11 महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी 4 एप्रिलला ‘आप’मध्ये सामील झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं होतं. भास्कर राव यांनी पक्ष सोडणं हा ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *