हुबळी : कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे भ्रष्ट सरकार आहे. ते पाडावे लागेल. त्या दृष्टीने कर्नाटकात आम आदमी पक्ष मजबूत करण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दावणगेरेला रवाना होण्यापूर्वी हुबळीतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही दिल्लीत काय केले हे देशातील सर्व लोकांना माहीत आहे. पंजाब आणि दिल्लीत सुशासन देणारे पारदर्शी, सामान्य सरकार दिले तसे आम्ही येथे देऊ. त्यादृष्टीने राज्यात आप बळकट करण्यात येईल, असे ते म्हणाले.
याचवेळी बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या प्रमाणेच पंजाबमध्येही समस्या आहे. केंद्रातील तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. मात्र कर्नाटकात ते परत घेण्यात आले नाहीत. येथील शेतकरी आत्महत्येला शरण आले आहेत. आम्ही ओपीएस लागू केले आहे. येथे अद्याप ओपीएस कार्यान्वित झालेली नाही. कर्नाटकातील शेतकऱ्यांचे प्रश्न ‘आप’ सोडवेल. स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार. मोफत वीज, बेरोजगारी निर्मूलन, उद्योग उभारणी यासाठी कार्यवाही करू.
पंजाब आणि दिल्लीच्या मॉडेलवर येथील जनतेनेही आपचे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
ऑस्ट्रेलियात खलिस्तानींनी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना, इथे आम्ही बंधुभावाने रहात आहोत, तिथे तसे नाही. आम्ही खलिस्तानवाद्यांच्या फुटीरतावादाच्या संघर्षावर लक्ष ठेवून आहोत असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta