Thursday , March 5 2026
Breaking News

येडीयुरापा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love

 

कलबुर्गी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलबुर्गी येथील जिवर्गी येथे ही घटना घडली.

येडीयुरप्पा ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा आला. त्यामुळे परिसरातील कचरा हेलिपॅडवर पडल्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर थोडा वेळ हवेतच फिरविले. वारा शांत झाल्यानंतर पोलीस व तेथील कर्मचाऱ्यांनी हेलिपॅड वरील कचरा साफ केला. हेलिकॉप्टरच्या पंख्यात प्लास्टिक कचरा अडकला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *