Saturday , September 21 2024
Breaking News

शिकारीपूरमध्ये येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक; संचारबंदी

Spread the love

 

आरक्षणाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन

बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर येथील भाजप जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरावर बंजारा समाजाच्या सदस्यांनी सोमवारी दगडफेक केली. राज्य सरकारच्या अनुसूचित समुदायांसाठी (एससी) अंतर्गत आरक्षणाच्या घोषणेला विरोध झाल्याने शहरात निषेधाज्ञा (कलम १४४) लागू करण्यात आला आहे.
या आंदोलनात काही पोलीस जखमी झाले. महिलांसह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लमाणी किंवा लंबानी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजातील काही जण जखमी झाले.
बहुतांश तरुणांनी येडियुरप्पा यांच्या घरात घुसून दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या, तेंव्हा पोलिसांनी कारवाई केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून येडियुरप्पा यांच्या घराशेजारी चपला आणि कपडे रस्त्यावर पसरले आहेत. घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या आहेत.
बंजारा समाजातील अनुसूचित जातींना ‘कमी’ आरक्षण दिल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात अनुसूचित समाजाच्या अंतर्गत आरक्षणाबाबत न्यायमूर्ती सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता.
अनुसूचित जातींचे आरक्षण १५ टक्यावरून १७ टक्यावर आणल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एससी डाव्या प्रवर्गासाठी ६ टक्के, उजव्या अनुसूचित जातींसाठी ५.५ टक्के, अस्पृश्यांसाठी ४.५ टक्के आणि इतरांसाठी एक टक्के आरक्षण जाहीर केले. राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून या प्रस्तावाचा राज्यघटनेच्या नवव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या

Spread the love  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *