Thursday , March 5 2026
Breaking News

भाजप आमदाराचा प्रताप…! भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर पाय ठेवून केलं अभिवादन

Spread the love

 

बिदर : रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या मूर्तीवर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात.
या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. शरणू सलगर मूर्तीवर पाय ठेवून फोटो काढताना दिसल्याने अनेक भाविक संतप्त झाले आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत ‘हिंदुत्व’ आणि प्रभू रामाच्या श्रद्धेबाबत भाजपकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भाजप नेत्यांनी देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने इतर अनेक घटनांचा ही उल्लेख केला. दाव्यांप्रमाणे खरच हिंदू धर्मरक्षक आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण हे कृत्य केले असून स्वत:हून तसे करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, अस शरणू सलगर यांनी म्हटलं.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *