बेंगळुरू : कर्नाटकमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणूकीत १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सरकारने घवघवीत यश मिळवले आहे. मात्र या विजयानंतर सध्याचा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे तो म्हणजे कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन काँग्रेसचे दिग्गज नेते या पदासाठी रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत आणि माध्यमांबाबत एक मोठी माहिती दिली आहे.
कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना अनेक नवनवीन विषय समोर येत आहेत. खासकरुन डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार अथवा नाही होणार प्रश्न पडलेला आहेच. मात्र त्यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांची भुमिका काय असेल याविषयी माहिती दिली आहे.
डीके शिवकुमार काय म्हणाले?
डीके शिवकुमार यांनी यावेळी म्हटले आहे की, ”काँग्रेस ही माझी आई आहे, आणि मी काँग्रेसमधून बाहेर पडणार किंवा माझ्या पदाचा राजीनामा देणार याविषयी कोणताही मीडिया सांगत असेल तर त्यांच्याविरोधात मी मानहानीचा दावा ठोकणार”. या प्रतिक्रियेनंतर डीके शिवकुमार यांचे काँग्रेससाठीचे खंबीर नेतृत्व दिसून येते. त्यांनी त्यांच्या पदाबाबतच्या कोणत्याही खोट्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत अशी भुमिका ठामपणे मांडल्याचे यामधून दिसून येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta