बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. बंगळुरूतील पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. बंगळुरूमध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. काही झाडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
आज (रविवार) दुपारी बंगळुरूमध्ये अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस पडला, यादरम्यान अनेक ठिकाणाहून गारपिटीच्या बातम्या आल्या आहेत, शहरात अजूनही पाऊस पडत आहे, त्याचा वेग कमी झाला असला तरी पाऊस या दरम्यान जोरदार वारा वाहू लागला हवामान खात्याने याआधीच येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे रविवारी वादळासह मुसळधार पाऊस झाल्याने 7 जणांना घेऊन जाणारी कार भुयारी मार्गात अडकल्याने 22 वर्षीय भानूरेखा या सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृत्यू झाला. केआर सर्कल अंडरपास येथे खोल पाण्यात अडकलेल्या कारमधून अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचार्यांनी कुटुंबातील 5 सदस्य आणि चालकाला वाचवले. हैदराबाद येथील सहा जणांचे कुटुंब रविवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीच्या दरम्यान कारमधून प्रवास करत होते. बॅरिकेड टाकून भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता पण कॅब चालकाने आपली कार अंडरपासमधून नेण्याचा प्रयत्न केला, असे सूत्रांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta