बेंगळुर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
बंगळुरू शहर, ग्रामीण, म्हैसूर, चिक्कमंगळूरू, शिमोगा, कोडगु, हासन आणि कोलार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तरेकडील अनेक भागात पाऊस सुरूच होता आणि पाऊस पडत असलेल्या भागात तापमानात घट झाली आहे. दरम्यान, कलबुर्गी येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून तापमानात कोणताही बदल झाला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta