म्हैसूर येथील धक्कादायक घटना
म्हैसूर : नागरहोळ राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत कर्नाटक-केरळ सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर अन्नाच्या शोधात जंगलातून नदीकडे आलेल्या हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
म्हैसूर- मानंदवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आज पहाटे एक हत्ती कोसळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता हत्तीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याची पुष्टी झाली.
गावातील उदय थॉमस याच्या बागेत लावलेल्या सोलार वायरचा धक्का लागून हत्तीचा मृत्यू झाला.
सोलार वायरला बेकायदेशीरपणे वीज पुरवठा केल्याच्या आरोपावरून उदय थॉमस आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध वन्यजीव कायदा 1972 च्या कलम 22 आणि 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीय बेपत्ता झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.