कुमठा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, असे महसूल मंत्री कृष्णा भैरे गौडा यांनी सांगितले.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा येथे बोलताना मंत्री म्हणाले की, मान्सून राज्यात दाखल झाला असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. इतर अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 गुरे मरण पावली. अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी उगवलेली पिके सुकून गेली आहेत. पाण्याची समस्या आहे. अशा क्षेत्रासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करून क्लाऊड सीडिंगबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta