Friday , December 12 2025
Breaking News

धारवाडजवळ गॅस टँकर उलटल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद!

Spread the love

 

बेळगाव : बेंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धारवाड उच्च न्यायालयाजवळ बुधवारी सायंकाळी गॅस टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

गॅस टँकर पलटल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किमी अंतरावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणखी काही तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. बेळगावहून धारवाडकडे जाणाऱ्या वाहनांना गोकाक-यरगट्टी-सौन्दत्ती मार्गाने जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.

पर्यायी मार्ग असा 

1) कित्तूर-तडकोड-गरग-धारवाड आणि शहराच्या हद्दीतून.

2) हिरेबागेवाडी-बैलहोंगल-बेळवाडी-तडकोड-गरग -धारवाड.

3) संकेश्वर-हुक्केरी-घटप्रभा-गोकाक-यरगट्टी-सौन्दत्ती-धारवाड.

4) निप्पाणी-चिक्कोडी-हुक्केरी-घटप्रभा-गोकाक-यरगट्टी-सौन्दत्ती-धारवाड.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *