Thursday , March 5 2026
Breaking News

टीव्ही अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love

 

मंड्या : हल्ली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता एका तरुण टेलिव्हिजन अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

टीव्ही अभिनेता पवन (२५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंड्या जिल्हा के.आर. शहरातील हरिहरपूर गावात राहणारा पवन हिंदी आणि तमिळ मालिकांमध्ये काम करत असे. आता पवनचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पवन हा मंड्याचा असून तो महाराष्ट्रात राहत होता. 16 ऑगस्ट रोजी पवनचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मृतदेह त्यांच्या मूळ गावी मांड्या येथे आणण्यात आला असून आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *