बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील एका गावात अज्ञात हल्लेखोरांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना होळेहोन्नूर गावात घडली असून रविवारी रात्री ही तोडफोड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१८ वर्षांपूर्वी गावाच्या मुख्य जंक्शनवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला होता. या घटनेच्या तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याच्या कृत्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून या गैरकृत्यामागे जो कोणी असेल त्याला पकडून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. यामुळेलोकांनी कायदा हातात न घेता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.