चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग 150 वर चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील गोल्लहळ्ळी गावाजवळ आज पहाटे केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात अपघात झाला. या अपघातात 4 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, रायचूरहून बंगळुरूला जाणाऱ्या केएसआरटीसी बसला एका लॉरीने जोरदार धडक दिली. धडक दिली. बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. रायचूर येथील रमेश आणि बेंगळुरू येथील पर्वतम्मा यांचा मृत्यू झाला असून 6 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर लॉरी चालक फरार झाला असून ही घटना आयमंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta