
होस्पेट येथील दुर्घटना
बंगळूर : दोन टिप्पर आणि क्रुझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट हद्दीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.
भीमलिंगा, केंचव्वा, उमा, भाग्य, गोनीबसप्पा, अनिल आणि युवराज अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृत होस्पेट येथील उक्कडकेरी येथील आहेत.
टिप्परचा एक्सल कापल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
होस्पेट शहराच्या बाहेरील बोगद्याजवळ दोन खाण टिप्पर लॉरी आणि क्रूझर यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात क्रूझरचा पूर्ण चुराडा झाला असून मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघातातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
विजयनगर जिल्ह्यातील हरपनहळ्ळी तालुक्यातील कुलाहळ्ळी येथील गोनीबसवेश्वर मंदिरात जात असताना हा अपघात झाला. येथील कुटुंबीयांची चिंता शिगेला पोहोचली आहे. होस्पेट, मरियममनहळ्ळी पोलीस ठाण्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta