बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव आटोपून नगरकडे प्रस्थान करताना एम.के. हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग-4 वर बुधवारी रात्री दुचाकीला झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. ज्याठिकाणी मृतदेह पडले तेथून सुमारे 300 मीटर अंतरावर दुचाकी आढळून आली. मृतांची नाव समजू शकलेली नाहीत. दुचाकीवरून दोन तरुण भरधाव वेगाने जात होते. हॉटेलमध्ये जेवण केलेले आणखी दोन तरुण रस्ता ओलांडत होते. दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिली. यात दुचाकीस्वार आणि पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta