हुबळी : हुबळी दंगल प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुजारीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हुबळी येथे 1992 मध्ये झालेल्या दंगली आणि दुकानाला आग लावल्याप्रकरणी आरोपी श्रीकांत पुजारी याला हुबळी पोलिसांनी 29 डिसेंबर रोजी अटक केली होती.
३१ वर्षांपूर्वी घडलेले प्रकरण पुन्हा उघडण्यात आले असून कारसेवकाला अटक करण्यात आल्याचे सांगत राज्य भाजपने आंदोलन सुरू केले होते. भाजप नेत्यांनीही पोलिस ठाण्यांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या सर्व घडामोडीनंतर हुबळीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने श्रीकांत पुजारीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.