बेंगळुरू : देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप आता कर्नाचकात ऍक्शनमोडमध्ये आली आहे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री शेट्टर भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. शेट्टर हे कर्नाटकातील लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी १० मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे भाजप पक्ष सोडला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आज कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टर हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. १० मे २०२३ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी हुबळी धारवाड सेंट्रल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शेट्टर म्हणाले होते की, मला सत्तेची भूक नाही, मला फक्त सन्मान हवा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट न देऊन माझा अपमान केला आहे, असंही ते म्हणाले होते.