
बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून शाळेच्या बसने कवटगी गावाकडे परतत असताना बस व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कवटगी येथील सागर कडकोळ (१७), श्वेता (१३), गोविंद (१३), बसवराज (१७) या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रहदारी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta