
होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत सविता आणि मुलगी अंकिता या यात्रेला जावून घरी परतत असताना बसची दुचाकीला धडक बसली आणि ऍक्टिव्हा होंडा बसखाली अडकली. यामध्ये सदर मायलेकी गंभीररित्या जखमी झाल्या. जखमींना तात्काळ भटकळ येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी मणिपाल येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बस चालक फकिरप्पा बसप्पा सवदत्ती याच्याविरुद्ध मानकी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta