बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे.
बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात १४ मार्च रोजी रात्री उशिरा लैंगिक अत्याचार झालेल्या ७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (८१) यांच्यावर २०१२ च्या बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी पुष्टी केली आहे की पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ८ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीसोबत असलेल्या आईने गुरुवारी सायंकाळी पोलिसात तक्रार दाखल केली. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याची खात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहे. गेल्या महिन्यात ०२ फेब्रुवारी रोजी अत्याचाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.