Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

आश्चर्यम्! झारखंडमध्ये एका महिलेने 5 मुलांना दिला जन्म

  रांची : आपण एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिल्याचे ऐकले आहे. मात्र, एखाद्या महिलेने एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला अशी कल्पनाही केली नसेल. मात्र, हे वास्तवात घडले आहे. झारखंडच्या रांची येथे सोमवारी एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात …

Read More »

विधानसभा अध्यक्षपदासाठी यु. टी. खादर यांचा अर्ज दाखल

  बेंगळुरू : माजी मंत्री आणि आमदार यु. टी. खादर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यु. टी. खादर यांनी विधानसभा सचिव कार्यालयात आल्यानंतर सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. यु. टी. खादर यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के. शिवकुमार, मंत्री जमीर अहमद, आमदार अजय सिंह यांनी पाठिंबा …

Read More »

पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 5 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जाहीर

  बेंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणखी चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने बंगळुरूसह 5 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असून खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बेंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चिक्कमंगळूरू, हसन आणि कोडगु जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण …

Read More »

मद्यपीचे चक्क गटारीत वास्तव्य, बेळगावातील प्रकार

  बेळगाव : दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र बेळगावात एका तळीरामाने आगळाच प्रताप केलाय. दारूच्या नशेत त्याने चक्क 2 दिवस गटारीतच वास्तव्य केले. काही नागरिकांच्या जागरूकतेमुळे त्याला बाहेर काढण्यात आले. बेळगावातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या एका गटारीत एक मद्यपी अडकल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. फुटक्या …

Read More »

नवनिर्वाचित आमदार हलगेकरांनी घेतली कन्नड भाषेत शपथ; मराठी भाषिकांत नाराजी

  खानापूर : खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शपथविधी संपूर्ण तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मराठी भाषिकांची मोठ्या प्रमाणात मते मिळवून विजय प्राप्त केलेल्या हलगेकर यांनी विधानसभेत मात्र कन्नडमध्ये शपथ घेत मराठी भाषिकांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शपथविधीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत …

Read More »

शिवजयंती मिरवणूक डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय; मार्केट पोलिस ठाण्यात बैठक

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी दि. 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली. हा …

Read More »

विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू

  बेळगाव : खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या श्रीनिवास फॅक्टरीच्या शेजारी वास्तव्यास असणाऱ्या बोंगाळे कुटुंबातील बालिकेला हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. मधुरा केशव मोरे (वय १३) या बालिकेचा विजेच्या धक्क्याने सोमवारी मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, मूळ येळ्ळूर राजहंसगड येथे राहणारी आणि …

Read More »

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा …

Read More »

जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न

  बेळगाव : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावीत शहरात प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सन्मानित

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …

Read More »