Monday , September 21 2026
Breaking News

श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे लसीकरण शिबिर संपन्न

Spread the love

 

बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे आयोजित डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आज शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

सध्याच्या पावसाळी दिवसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री मंगाईनगर येथील धामणेकर हॉल येथे आज सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा सुमारे 350 स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. या सर्वांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधक डोस देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री मंगाईनगर रहिवासी संघटना वडगावच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *