Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत घट

  बेळगाव : शहरवासियांची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयामधील पाणी पातळी खालावत चालल्याने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. मात्र आता राकसकोप जलाशयात केवळ पावणे सात फूट पाणीसाठा शिल्लक राहिला असून वीस दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. पण यंदा वळीव पावसाने दडी दिल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी …

Read More »

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य!

  बेळगाव : बेळगाव उन्हाळी सुटीनंतर कर्नाटकातील शाळा सोमवार दि. २९ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. मागील वर्षी पाठ्यपुस्तकांतील …

Read More »

खानापूरात आमदार भाजपचा, राज्यात सत्ता काँग्रेसची कसा होईल विकास

  खानापूर : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी संपली. निकाल लागले. तसे राजकारणाचे वारे बदलले. राज्यात भाजपचे सरकार येईल अशी अशा होती, मात्र राजकीय चित्र पालटले व काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळविली. परंतु खानापूर तालुक्यात राजकीय चित्र वेगळेच झाले. खानापूर तालुक्यात भाजपचा आमदार झाला आणि राज्यात सत्ता काँग्रेसची आली. मागील …

Read More »

फटाके फोडणे, शिवीगाळ प्रकरणी नगरसेवक नितीन जाधवसह २३ जणांविरुद्ध गुन्हा

  बेळगाव : होसूर बसवान गल्ली, शहापूर येथे माजी नगरसेविका सुधा मनोहर भातकांडे यांच्या घरात फटाकडे फोडण्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुधा भातकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे. विनायक काळेनट्टी, परशराम पेडणेकर, जयनाथ जाधव, राहुल …

Read More »

लोकसभेसाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी सुरु : संयुक्त पत्रकार परिषदेत संकेत

  मुंबई : आगामी निवडणुका एकत्र लढण्याकरिता सर्व घटक पक्षांना एकत्रित बोलावून निर्णय घेणार आहाेत. आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरही आम्‍ही चर्चा करणार आहाेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. १४) संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यातील महाविकास आघाडीची आज सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर आयाेजित संयुक्‍त …

Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून बेळगावच्या युवकाची नियुक्ती

  बेळगाव : केळकर बाग बेळगाव येथील युवक अभिषेक जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वयक म्हणून काम नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांची महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. अभिषेक जाधव हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. नवी दिल्ली येथील …

Read More »

कर्नाटकमध्ये अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद?

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला चारी मुंड्या चीत केले आहे. येथे काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळविला असून बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात एकहाती सत्ता आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदीआनंद आहे. तर येथे भाजपाला अवघ्या 66 जागांवर विजय मिळवू शकला आहे. दरम्यान, ही निवडणूक काँग्रेसने जिंकल्यानंतर येथे मुख्यमंत्रीपदाची …

Read More »

हत्तरगी टोल नाक्याजवळ जंगली हत्ती

  हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी जवळील जंगलातून अन्नाच्या शोधात हत्ती नदीवर आल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्तीला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची व्यवस्था केली आहे. स्थानिकांनी येथील राष्ट्रीय महामार्ग ४ वरील रिलायन्स पेट्रोल पंपावर एक हत्ती पाहिला आणि तो त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. …

Read More »

“पाकिस्तान झिंदाबाद”च्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : ऍड. एम. बी. जिरली

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच बेळगाव आरपीडी मतमोजणी केंद्राजवळ पाकिस्तान झिंदाबाद नारा देणाऱ्या बदमाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी शहरातील भाजप कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, काल मतमोजणीवेळी, शहरातील मतमोजणी …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांनी गवतगंजीवर फटाके टाकल्याने आग लागून मोठे नुकसान

  धामणे येथील प्रकार : पोलिसांची बघ्याची भूमिका बेळगाव : अतिउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी धामणे येथे घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी समिती कार्यकर्त्यांच्या घरासमोर केली. आतषबाजी करताना फटाके गवताच्या गंजीवर टाकल्याने गवतगंजीला आग लागली. त्यामुळे शेतकरी भैरू धर्मूचे आणि ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. धामणे येथील …

Read More »