Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

शब्दगंध कवी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी “शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे” आयोजन

  वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटाकरिता आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ गेली ३३ वर्षे मराठी कविता आणि कवींसाठी कार्यरत आहे. मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगावातील काव्य परंपरा समृद्ध करण्याचे कार्य करते आहे. ३३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

चापगाव ग्राम पंचायतीतर्फे स्वच्छता अभियान

  खानापूर : 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने चापगाव ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानांतर्गत चापगाव गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली. माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमेश धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वछता मोहीम राबविण्यात आली. चापगाव याडोगा रोडवरील स्मशानभूमी धबाले बंधूंच्या आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या …

Read More »

अखेर बेपत्ता संपतकुमार तेलंगणात सापडला!

  खानापूर : 24 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेला खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथील संपतकुमार बडगेर हा तरुण सध्या तो तेलंगणा राज्यात असल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या आठ दिवसापासून खानापूर तालुक्यातील कोडचवाड गावातील संपतकुमार बडगेर नामक तरुण बेपत्ता झाला होता. पण त्याची दुचाकी व मोबाईल फोन येडोगा धरणाजवळ आढळून आल्याने …

Read More »

राज्यात ग्राम न्यायालये स्थापण्याचा गांभिर्याने विचार

  सिध्दरामय्या; गांधी ग्राम पुरस्कार वितरण बंगळूर : खेड्यांचे वाद खेड्यातच सोडवले जावेत. या महत्त्वाकांक्षेने सरकारने ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा गंभीर विचार केल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातर्फे विधानसौधमधील बँक्वेट हॉल येथे आयोजित २०२३ चा गांधी ग्राम पुरस्कार वितरण आणि स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण राज्यस्तरीय पुरस्कार …

Read More »

शिमोगा येथे ईद मिलाद रॅलीत दगडफेक, घरांचे नुकसान

  शहरात तणावपूर्ण शांतता; ४० जण ताब्यात बंगळूर : शिमोगा शहरातील शांतीनगर भागात पुन्हा हिंसाचार उसळला. ईद मिलादच्या मिरवणुकीत काल सायंकाळी कांही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात कांही घरांच्या काचा फुटल्या व वाहनांचेही नुकसान झाले. त्यात कांहीजण जखमीही झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. शहरात कर्फ्यू …

Read More »

खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीला “गांधी ग्राम पुरस्कार” प्रदान

  खानापूर (वार्ता) : उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पंचायतीला दिला जाणारा गांधी ग्राम पुरस्कार यंदा बेकवाड ग्राम पंचायतीला मिळाला असून, तो पुरस्कार सोमवारी बेंगळूर येथे मोठ्या थाटात पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांच्याहस्ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री उमा माधवन, राज्य सचिव अंजुम परवेझ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ग्राम …

Read More »

मटका प्रकरणी निपाणीत एकावर कारवाई

  निपाणी (वार्ता) : मटका खेळणे आणि घेण्यावर बंदी असताना मटका घेत असताना आढळल्यानंतर निपाणी पोलिसांनी सोमवारी (ता.२) सायंकाळी एकावर कारवाई केली. यशवंत शंकर वालीकर (रा. लक्ष्मीनगर, निपाणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तलवार यांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक अंदर- बहार मटका घेत असल्याची …

Read More »

भारत विकास परिषदेची आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवारी अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत किशोर काकडे उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. एन्. जोशी, विभागीय सचिव पांडुरंग नायक, कर्नाटक प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर, संयोजक डाॅ. जे. जी. नाईक, बेळगांव …

Read More »

माणुसकीच्या दृष्टीने समाजात कार्य करा

    आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावमध्ये दशलक्षण पर्व निमित्त मिरवणूक निपाणी (वार्ता) : जगणे सोपे असून प्राणी आणि पक्षी देखील जगतात. परंतु जीवन घडविण्याची कला शिकणे सोपे नाही. जो ही कला शिकतो तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो. शुद्ध जीवन जगण्यात खरा धर्म असून सर्वांनी माणुसकीच्या दृष्टीने समाजात …

Read More »

नवोदित गायक कलाकारासाठी कागल संगीत अकादमीचे योगदान नक्कीच आदर्शवत : पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार

    कागल (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या युगात संगीत हीच मानवाची खरी ऊर्जा आहे. मानवाच्या आयुष्याची उंची वाढवण्याचे काम सुद्धा संगीत करीत असते. आजच्या काळात तीन -चार वर्षाच्या मुलापासून वयोवृद्ध झालेल्या व्यक्तींची टीव्ही वरती गाणी ऐकली की खूप आनंद मिळतो. आज गायन कलेतील गायकांचे विशेष कौतुक, कारण साधने शिवाय कला …

Read More »