बेळगाव : जर्मनी येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स तसेच कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात थायलंड, पटाया येथे होणाऱ्या मिस्टर आशिया 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या चेतन …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची सुनावणी लांबणीवर
बेळगाव : काल दि. १८ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील एकूण सहा खटल्यांची बेळगाव न्यायालयात सुनावणी होती. साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे सर्व खटले पुढे ढकलण्यात आले. सकाळपासूनच न्यायालयीन आवारात समिती कार्यकर्त्यांची वर्दळ पाहावयास मिळाली. खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे सर्वच खटले तहकूब करून पुढील तारीख निश्चित करण्यात आली. 2021 च्या महामेळाव्याच्या खटल्यात …
Read More »नियमित बससेवेसाठी अतिवाड ग्रामस्थांचे परिवहन विभागावर मोर्चा
बेळगाव : दोन वर्षांपासून अतिवाड गावाला अनियमित बस सेवा असल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे. अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी परिवहन विभागा विरोधात मोर्चा काढत रास्तारोको केले. यादरम्यान परिवहन विभागाच्या प्रतिनिधींना जाब विचारल्यानंतर गावात शौचालयाची सुविधा नसल्याने …
Read More »खो- खो ची विजयी झंकार, ताराराणी काॅलेजचा बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत प्रहार!
बेळगाव : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय नेहमीच अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये बेळगाव जिल्ह्यात अग्रगण्य कॉलेज राहिले आहे. अभ्यासात अव्वल स्थानी असणाऱ्या येथील विद्यार्थिनी क्रीडाक्षेत्रातही उत्तम नावलौकिक मिळवित आहेत. खानापूर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या या महाविद्यालयाच्या खो- खो पथकातील खेळाडू कु. नीलम कक्केरकर (कर्णधार), कु. लक्ष्मी हंगिरकर, …
Read More »अमन नगर येथे तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू
बेळगाव : थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेकोटीमुळे तिघांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील अमन नगर येथे घडली आहे. अमन नगर भागात एका खोलीत चार भावंडे वास्तव्यास होती. सध्या बेळगावात थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीमध्ये कोळशाची शेगडी पेटवण्यात आली होती. रात्री झोपताना …
Read More »डॉ. आंबेडकराच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगरपंचायतीकडे जागा देण्याची निवेदनाद्वारे मागणी
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी शासनाकडून ५ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीतून सुसज्ज कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्याच्या समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनासह नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना बहुजन समाजातर्फे देण्यात आले. विजयकुमार शिंगे यांनी, …
Read More »विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते : अभिजीत उदयसिंग सरदेसाई
कारलगा हायस्कूल कारलगा येथे फिरते विज्ञान प्रयोगालय खानापूर : विज्ञान प्रयोगातूनच सिद्ध होते. सृष्टीतील रहस्य उकलून मानवाच्या प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य विज्ञान करते. त्यांनी विज्ञानाचे विविध उपयोग स्पष्ट करत विज्ञान मानवी जीवनाचा उत्क्रांतीत कसा सकारात्मक बदल घडवतो, असे प्रतिपादन कायदे सल्लागार अभिजीत उदयसिंग सरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी …
Read More »म. मं. ताराराणी काॅलेजचा अभिमान, स्वाती सुनील पाटील हीचा निबंध स्पर्धेत सन्मान
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यालय नेहमीच सर्वांगीण विकासाबरोबर विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक दृष्टिकोन जोपासणारे विद्यालय म्हणून समस्त खानापूर व बेळगाव जिल्ह्याच्या परिचयाचे आहे. मौजे मुगळीहाळ सरकारी कॉलेज मध्ये खानापूर तालुक्यातील पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धा सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 संपन्न झाल्या. या अंतर्गत इंग्रजी निबंध …
Read More »काळविट मृत्यू प्रकरण; भूतरामहट्टीसह परिसरातील गावांना खबरदारी घेण्याची सूचना
बेळगाव : राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील एकापाठोपाठ एक 31 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 नोव्हेंबरपासून प्राणी संग्रहालयातील काळवीट एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्याची घटना घडत होती. मृत काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात सदर काळविटांचा मृत्यू ‘हेमोरेझीक सेप्टीसेमिया’ नावाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला …
Read More »सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेजमध्ये एनएसएस शिबिराची सांगता
बेळगाव : सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेज शहापूर डीडी 0024 बेळगावच्या एन. एस. एस. वार्षिक विशेष शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चिंतामणी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विजया नाईक, समाज शास्त्राचे प्राध्यापक एस. एस. हिरेमठ सर, कॉलेजच्या लायब्ररीएन सविता गुड्डीन मॅडम, कॉलेजच्या एफ. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta